‘निद्रानाशाची रोजनिशी’ : स्वप्नांचा, संकल्पनांचा, माणूसपणाचा पाठलाग करणारी आत्मशोधाची कविता
‘निद्रनाशाची रोजनिशी’ मधील कविता स्वतंत्रपने वेगवेगळी अनुभूति देणार्या असल्या तरी त्यात एक सातत्य आहे. आत्ममग्नता हा तिचा विशेष आहे. यातील प्रत्येक कविता एक स्वतंत्र अनुभूती असली तरी त्यातून जगण्याविषयीचे सलग चिंतन आणि महत्त्वाचे म्हणजे ताटवापर्यंत पोहचण्याची धडपड दिसते आणि म्हणूनच आत्ममग्न असूनही ती कविता प्रातिनिधिक होते.......